मुंबई महापालिकेवर ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नाकारली

0

मुंबई- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर नियोजित असलेल्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या मोर्चासाठी ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरु होती व मोर्चाचा टीझरही उबाठाच्या वतीने काढण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मोर्चाला परवानगी नाकारल्याची माहिती असून आता ठाकरे गटाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे.
मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.