इतक्या वर्षात केसीआर पंढरपूरला कधी आले – संजय राऊत

0

मुंबई Mumbai –  के. सी. आर  KCR महाराष्ट्रात आले काय, ताफा घेऊन आले, उमरखेड्यात जेवणावळी झाल्या, पंढरपूरला चालले आहेत, हे शक्तिप्रदर्शन तुम्ही कोणाला दाखवत आहात? तुम्ही  MAHARASHTRA महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष फुटला आहे. अनेक माजी मंत्री, अनेक माजी खासदार आणि प्रमुख नेते यांनी काल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असे प्रतिपादन शिवसेना नेते खा  SANJAY RAUT संजय राऊत यांनी केले.

तेलंगणातला हा पक्ष महाराष्ट्रात 600 गाड्या 700 गाड्या, हे पैशाचे, संपत्ती आणि सत्तेचे ओंगलवणे दर्शन आहे, जे शिंदे करतात, मात्र, राज्याची जनता सुज्ञ आहे. के. सी. आर आता हे स्पष्ट झाले आहे, भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे.मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते विकत घेणे, हा पैसा इथे येतो कुठून? याची चौकशी व्हायला पाहिजे.त्यांचे स्वागत कसलं करता? के. सी. आर जवळ जवळ नऊ दहा वर्ष तेलंगणाचे किंवा आंध्र मध्ये मंत्री होते, केंद्रात मंत्री होते, इतक्या वर्षात स्वतः एकदा तरी सहकुटुंब पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेतलं का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.के. सी. आर आमचे व्यक्तिगत मित्र आहेत. त्यांनी ठरवायला पाहिजे आपल्याला नक्की कोणा बरोबर राहायला हवं याकडे लक्ष वेधले. दरम्यान,ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही आतापर्यंत जगलात, वाढलात आणि त्याच नावावर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवले. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर तुम्ही हातोडे मारण्याचे आदेश देता असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर, सुपुत्रावर केला.

 

तेलगंणा मधील रजाकार गुलाबी पेहराव करुन महाराष्ट्रात – आशिष देशमुख

मुंबई : तेलगंणामधील लोक गुलाबी पेहराव करुन पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी येत आहेत. अशा या रजाकारांना खऱ्या अर्थाने धडा शिकवण्याचे काम महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही. तेलगंणाचे आक्रमण महाराष्ट्र सहन करणार नाही. तेलगंणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत राहणार नाही.