शेतकरी हाच खरा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा – सुनील केदार

0

 

 

*सावनेर येथे जिल्हास्तरीय कृषी-पशुपक्षी मेळावा व प्रदर्शनी संपन्न*

 

*मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती*

 

सावनेर : कृषी, पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद नागपुर व पंचायत समीती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर येथे भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य कृषी व पशु पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन क्षेत्राचे आमदार तथा माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदाताई राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर सौम्या शर्मा कृषी पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती सभापती जिल्हा परिषद नागपूर प्रवीण जोध अर्थ शिक्षण व क्रीडा समिती जिल्हा परिषद नागपूर राजकुमार कुसुंबे महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर प्रा.अवंतिका लेकुरवाळे समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर मिलिंद सुटे सभापती पंचायत समिती सावनेर अरुणा शिंदे उपसभापती राहुल तिवारी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे सुमित्रा कुंभारे छाया बनसिंगे नीलिमा उईके ज्योती सिरसकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

या भव्य कृषी-पशुपक्षी मेळावा व प्रदर्शनी कार्यक्रमात विविध प्रजातींचे पशुपक्षी, प्राणी, शेती लागवडी करीता आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित शेती संबंधित साहित्याचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते.

 

आपल्या उद्घाटनपर भाषणात माजी मंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना शेतकरी हाच खरा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्याने आपल्या शेती व्यवसायासोबत पशु-पक्षी पालनाचा जोडधंदा स्वीकारला तर शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारेलच सोबतच जिल्हा आर्थिक विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता असलेल्या विविध योजना ग्रामीण भागातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे भविष्यात कसे करता येईल याविषयी आपले मत व्यक्त करताना शेती व्यवसायासोबतच आपले आर्थिक समृद्धीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्यांचा लाभ घ्यावा. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्या भागातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांची मदत घेऊन पशुपालनाच्या व्यवसायाची कास धरावी अशी विनंती अपल्या संबोधनातून केली*

या प्रदर्शनात चांगल्या प्रतीच्या दुभत्या गाई, म्हशी, मेंढ्यांच्या जाती आहेत. शेळी, कोंबडी व इतर प्राण्याचे विविध स्टॉल शेतकरी बांधवांकडून लावण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, ग्रामीण शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी नागपूर जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनीलबाबू केदार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्याने पशुसंवर्धन व दुग्धविकास क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करून अनेक योजना राबविल्या. नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि आजही ते सुरू आहेत. साहेबांनी दिलेल्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले.

*कडक उन्हातही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती*

*या मेळाव्याला सावनेर क्षेत्रातीलच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने कडक उन्हामध्येही शेतकरी बांधव उपस्थित होते. व त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता.*

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र चिखले उपसभापती प्रकाश लांजेवार माजी जिल्हा परिषद सदस्य बैद्यनाथजी डोंगरे पंचायत समिती सावनेरचे सर्व सदस्य तथा सावनेर क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.