मेळघाट काटकुंभ येथे बनावट दारूच्या 200 पेट्या जप्त

0

 

अमरावती- अमरावती जिल्ह्यात बनावट दारू विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेळघाट मधील कटकुंभ येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने, बनावट दारूची अवैधरित्या विक्री होत असल्याचं निदर्शनास आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सापळा रचून 200 बनावट दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या. अंदाजे 10 लाख रुपयांची बनावट दारूवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 1आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. या संदर्भात पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.