ठाकरे गटाला तात्काळ दिलास देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

0

नवी दिल्ली : शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. शिवसेनेचे खासदार सुनील प्रभू यांनी न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या आपात्रतेचा तसेच शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याच्या मुद्दयाचा समावेश आहे. हा निर्णय हे बेकायदा असून यावर निर्णय घेण्याचे घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष तसेच निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती त्यांनी याचिकेतून केली होती. यावर न्यायालयाने जम्मू आणि काश्मीरवरील घटनापीठ संपेपर्यंत प्रतीक्षा करा, आम्ही तुम्हाला तारीख देऊ, असे स्पष्ट सांगितले. ही याचिका तातडीची याचिका असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. त्यावर ही याचिका धनुष्यबाण चिन्हाबद्दल आहे का? असेल तर आम्हाला ती ऐकावी लागेल. घटनापीठासाठी प्रतीक्षा करा, आम्ही याची यादी तयार करू, असे न्यायालयाने स्पष्ट केले.