भाजपची ती जुनीच सवय, कर्नाटकने दिली चपराक – सुषमा अंधारे

0

 

नागपूर कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे हे निकाल देशभरात मोदी है तो मुमकिन हैं , असं म्हणणाऱ्यांसाठी चपराक आहेत.

मागील नऊ वर्षात मोदींनी प्रचंड नकारात्मकतेच हेट पॉलिटिक्स पसरवलं. त्याला लोक कंटाळलेले आहेत. भाजपा स्लीपर सेलने राहुल गांधी यांना पप्पू ठरविण्याचे प्रयत्न केले. तो पप्पू सगळ्याच बाप निघाला, पप्पू सिर्फ पास नही हुआ , पप्पू मेरीट मे आया है..अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गट शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. बेरोजगारी, महागाई याचा ग्रोथ रेट पाहता कर्नाटकमधील जनता सुजाण आहे. दक्षिण भारतीय प्रगत विचारधारेचे आहे. आणि या येणाऱ्या निकालाचा फायदा आणि नवी ऊर्जा येणाऱ्या काळात महारष्ट्रात पाहायला मिळेल.
भारत जोडो यात्रेचा नक्कीच फायदा झाला. राहुल गांधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, त्यांच्यासोबत नेहरू, गांधी त्यांच्या सगळ्या परिवाराची इमेज खराब करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने झाला असेही त्या म्हणाल्या.

धर्माच्या नावाने मत मागणे, ही भाजपची फार जुनी सवय आहे. जेव्हा भाजप वेगवेगळ्या आघाडीवर अपयशी ठरते , तेव्हा -तेव्हा भाजप महापुरुषांच्या फोटो आड लपते असा आरोप अंधारे यांनी केला.