माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

0

मुंबई : राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावरील निलंबनाचे आदेशही मागे घेण्यात आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यावर तत्कालीन सरकारने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या आरोपांवरून त्यांना कारागृहातही जावे लागले होते. डिसेंबर, २०२१ मध्ये निलंबनाचे आदेश काढण्यात आले होते, हे विशेष.
कॅटचे आदेश
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप कॅटने फेटाळले असून त्यांची चौकशी देशील बेकायदेशीर ठरविली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबनही कॅटनेच रद्द केले आहे. आम्ही केवळ त्या निर्णयांची अंमलबजावणी केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यांचा निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी मानला जाणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
आरोप काय होते
परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. अँटीलिया बॉम्ब प्रकरणात कथित अनियमिततेमुळे त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवण्यात आले होते. परमबीर सिंह यांच्यावरील या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच स्वतंत्र गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोंदवले होते. तत्पूर्वी परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना तब्बल वर्षभर कारागृहात रहावे लागले होते. काही महिन्यापूर्वीच अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे.