नागपूर NAGPUR -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा आज मंगळवारी विधानभवनाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी महाराज बाग चौक परिसरात अडविला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात होता. बुलडाणा येथून निघालेला हा मोर्चा काल रात्री नागपुरात पोहचला. आज सकाळी अमरावती रोडमार्गे हा शेतकरी प्रश्नी आक्रमक मोर्चा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करीत, हाती फलक घेऊन विधानभवनकडे निघाला असता पोलिसांनी त्यांना रोखले, दरम्यान रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी विरोधी, पणवती असल्याचा आरोप केला. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा शब्द रविकांत तुपकर यांना यापूर्वी झालेल्या बैठकीत दिला होता. मात्र, 15 डिसेंबर उलटून देखील शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा रोखला, रविकांत तुपकर ताब्यात
Artical Blog
Hindi News
Artical Blog
















