नागपूर: इंद्रायणीच्या उगमस्थानापासून आळंदी, देहूत पोहोचेपर्यंत ३ औद्योगिक क्षेत्रे, मोठी शहरे, अनेक मोठ्या ग्रामपंचायती आहेत. बऱ्याच ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. यानंतरही प्रदूषण कायम आहे. इंद्रायणीला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रकल्प राबविला जाईल. अमृत योजनेतून ७७२ कोटींचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या विषयावर संबंधित यंत्रणांची पुण्यात २६ ला एकत्रित बैठक घेतली जाईल. संबंधित ५-६ यंत्रणांची एकत्रित समीतीसंदर्भातही विचार केला जाईल, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात उमा खापरे, रमेश पाटील यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर केसरकर यांनी ही माहिती दिली.















