Home Top News विदर्भातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही – अनिल देशमुख

विदर्भातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही – अनिल देशमुख

0

 

नागपूर- विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक योजनेसाठी काही योजना जाहीर केल्या मात्र,अतिशय दुःखाची गोष्ट आहे की, विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना आज सोयाबीन, कापसासाठी कुठलीही घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून झाली नाही अशी नाराजी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
कापसाला भाव नाही, सोयाबीन बद्दल सुद्धा कोणती मदत राज्य शासनाने जाहीर केली नाही. आज विदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न कापूस, सोयाबीन आणि संत्र्याचा आहे.या शेतकऱ्यांना कोणतीही मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या सरकारने केली नाही यामुळेच राज्य सरकारचा निषेध करून आम्ही सर्वांनी सभात्याग केला. अजून सुद्धा दोन दिवस आहेत मुख्यमंत्र्यांनी कापसाच्या आणि सोयाबीनच्या बाबतीत राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.दरम्यान,
अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता .मी आपल्याला माजी गृहमंत्री सांगतो कोणताही एका जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक स्वतःच्या अधिकारात अशा पद्धतीने लाठीचार्ज करू शकत नाही आदेश आल्यानंतरच लाठीचार्ज करण्यात आला, असा माझा आजही आरोप आहे असेही आ. अनिल देशमुख म्हणाले.