स्वाती चाटी ठरल्या विदर्भाच्या नंबर 1 शेफ

0

– अभिनेत्री प्रिया मराठे, सपना मुनगंटीवार, विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत रंगला शानदार बक्षीस वितरण सोहळा

 

शंखनादच्या विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर : अखेर प्रतीक्षा संपली…! अतिशय उत्कंठावर्धक अशा दोन दिवसांच्या खाद्ययात्रेतील सर्वोत्तम स्पर्धक म्हणून स्वाती चाटी या 51 हजार रुपयांच्या बक्षिसासह विदर्भाच्या नंबर 1 शेफ ठरल्या. महाराष्ट्र टेलीकम्युनिकेशन्सद्वारे संचालित शंखनाद न्यूज चॅनल आणि पोर्टलच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेचा शानदार बक्षीस वितरण सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला. शनिवारी पहिल्या फेरीतून निवडण्यात आलेल्या 50 सर्वोत्तम स्पर्धकांमधून आज पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी निवडण्यात आले. यात दुसरा क्रमांक आकाश देशभ्रतार यांनी तर तृतीय क्रमांक आकांक्षा जक्कल यांनी पटकावला. या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५१, २१ आणि ११ हजार रुपयांची रोख बक्षिसे,स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र दिली गेली. उर्वरित सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र,भेटवस्तू देत अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ( Spontaneous response to Vidarbha level cooking competition of Shanknad Nagpur: Finally the wait is over…! Swati Chatti emerged as Vidarbha’s No. 1 Chef with a prize of Rs 51,000 as the best contestant in an exciting two-day food yatra) 

कोराडी मार्गावरील बोखारा येथील तुली काॅलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दोन दिवस या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. अगदी दोन महिन्यांच्या छोटयाशा बाळाला घेऊन आलेल्या भगिनी असो की महाविद्यालयीन तरुणी,ज्येष्ठ महिला असा उत्तम सहभाग यात होता. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे, शेफ विष्णू मनोहर आणि सपना मुनगंटीवार, प्रसिद्ध उद्योजक वाघमारे मसालेचे प्रकाश वाघमारे, तुली काॅलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या संचालिका उर्वशी यशराॅय, आरतीताई वाघमारे, शंखनाद खाद्ययात्रा मालिका आणि या स्पर्धेच्या समन्वयक, सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर आणि शंखनादचे संपादक सुनील कुहीकर, संचालिका राखी कुहीकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी स्पर्धेविषयीची सविस्तर माहिती दिली.शंखनादचे संपादक सुनील कुहीकर यांनी मीडिया हाऊसची जबाबदारी केवळ बातमी न देता समाजहितासाठी काय करू शकतो हे पाहणे महत्वाचे आहे नेमका हाच ध्यास आम्ही घेतल्याचे आवर्जून सांगितले. सपना मुनगंटीवार यांनी आज महिलांनी करिअर आणि घर सांभाळताना बाहेरचे खाद्यान्न मागवावे लागत असले तरी सात्विक आहारावर, या माध्यमातून मुलांच्या संस्कारावर भर देण्याची गरज व्यक्त केली.

( A grand prize distribution ceremony of the Vidarbha level cooking competition organized by Shanknad News Channel and Portal run by Maharashtra Telecommunications was held on Sunday evening. Today, the top three rankers were selected from the top 50 contestants selected from the first round on Saturday. Akash Deshbhartar got the second rank and Akanksha Jakkal got the third rank. These three winners were given cash prizes of Rs 51, 21 and 11 thousand, mementos and certificates respectively. All the remaining contestants were honored by the guests by giving certificates and gifts. ) या स्पर्धेतंर्गत पहिल्या दिवशी शनिवारी स्पर्धकांना त्यांना आवडणारा कुठलाही एक शाकाहारी पदार्थ घरून बनवून आणून तो स्पर्धेच्या ठिकाणी आकर्षक पद्धतीने प्रेझेंट करायचा होता. यानिमित्ताने एकापेक्षा एक सरस पाककृती साकारल्या गेल्या. या अतिशय चुरशीच्या फेरीतून 50 स्पर्धक अंतिम फेरीत निवडले गेले. आज रविवारी दोन टप्प्यात झालेल्या अंतिम स्पर्धेत सावजी पद्धतीचा कुठलाही एक शाकाहारी पदार्थ आणि पोळी लाईव्ह तयार करायची होती. अंतिम फेरीतील सर्व 50 स्पर्धकांना आता शंखनाद वाहिनीवरील खाद्ययात्रा मालिकेत आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.

प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यानिमित्ताने दोन दिवस नाविन्यपूर्ण आणि आकर्षक सजावटीसह शाकाहारी डिशेस बघायला, चाखायला मिळाल्याची दाद परीक्षकांनी दिली.उत्तमोत्तम पाककृती पाहायला मिळाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिक देखील सहभागी झाले. प्रमुख अतिथींना वेगळ्या शैलीत बोलते करीत अतिशय खुमासदार संचालन चंद्रपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी सुशील सहारे यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध शेफ पूनम राठी, देवल येळणे, मंजुषा देशपांडे, विशाल चवरे, मधुरिका चौधरी, रिझवाना दिवाण यांनी केले. या सर्वांचा अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शंखनाद न्यूज चॅनलचे व्यवसाय व्यवस्थापक विनोद अंभोरे, मुख्य वार्ताहर सनी भोंगाडे, प्रशासकीय अधिकारी मीनल चतुरपाळे, ज्येष्ठ रंगकर्मी सुशील सहारे, पंकज मलिक, मयुरेश गोखले, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार, प्रवीण दुपारे, कुणाल मंचलवार, अनुष्का काळे, आशीष उके, प्रियंका ठाकरे, माला दोडके आदी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ( Shanknad News Channel Business Manager Vinod Ambhore, Chief Correspondent Sunny Bhongade, Administrative Officer Meenal Chaturpale, Senior Painter Sushil Sahare, Pankaj Malik, Mayuresh Gokhale, Senior Journalist Rajendra Uttalwar, Praveen Dupare, Kunal Manchalwar, Anushka Kale, Ashish Uke, Priyanka Thackeray, Mala Dodke etc colleagues worked hard.)

 मी पुन्हा येणार, नागपुरी व्यंजनांचा आस्वाद घेणार – प्रिया मराठे

 

-शंखनादच्या उपक्रमाची केली प्रशंसा नागपूर :खरेतर नागपूरला माझे कुणीही ओळखीचे नसताना नागपुरात आल्यापासून आपुलकीचे स्वागत, शिष्टाचार बघून मला नक्कीच नागपूरकरांचे मोठे मन कळले. या पुढच्या काळात मी पुन्हा येणार, नागपूरच्या व्यंजनांचा आस्वाद घेणार अशी ग्वाही प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांनी आज दिली. कुठल्याही कलावंताला फॅशन, इमोशन आणि डेडिकेशन हे महत्त्वाचे असते कुकिंगच्या क्षेत्रातही हे नितांत गरजेचे आहे किंबहुना प्रत्येकाला पोळी, भाजी किमान खिचडी करायला यायलाच हवे याविषयीचे शिक्षण शाळेतून द्यायला हवे, कधीकाळी स्त्रियांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात आता पुरुषही दमदारपणे पुढे जात आहेत असे प्रशंसोदगार यावेळी अभिनेत्री प्रिया मराठे यांनी काढले. सर्वांचे कौतुक करताना हे अतिशय कठीण काम आहे कधीकाळी ते कनिष्ठ मानले जात होते मात्र आज या स्पर्धेच्या निमित्ताने यातले ग्लॅमर पुढे आले आहे ‘शंखनाद’ परिवाराचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे यावर भर दिला. एकंदरीत पहिल्याच नागपूर भेटीत त्यांनी आपल्या साधेपणाने, आपुलकीने सर्वाना जिंकले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा