
चंद्रपूर, दि. ३ डिसेंबर : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर केंद्रातून नवोदिता, चंद्रपूर या संस्थेच्या तांडा या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर या संस्थेच्या कर्नल सरंजामे आणि ती या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
कलारसिक, यवतमाळ या संस्थेच्या फेस टू फेस या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक प्रशांत कक्कड (नाटक- तांडा), द्वितीय पारितोषिक संजय रामटेके (नाटक- कर्नल सरंजाने आणि ती), तृतीय पारितोषिक ऋषीकेश निवल (नाटक- फेस टू फेस) प्रकाश योजना प्रथम पारितोषिक मिथुन मित्रा (नाटक- तांडा), द्वितीय पारितोषिक शिवशंकर माळोदे (नाटक- कर्नल सरंजामे आणि ती), तृतीय पारितोषिक हेमेंत गुहे (नाटक चितपट), नेपथ्य: प्रथम पारितोषिक संकेत पगारे (नाटक- कर्नल सरंजामे आणि ती) द्वितीय पारितोषिक रुपाली धकाते (नाटक- तीन पायांची शर्यत), तृतीय पारितोषिक सूरज चिकटवार (नाटक- चितपट) रंगभूषा प्रथम पारितोषिक ज्योती करणुके (नाटक- तांडा), द्वितीय पारितोषिक शैला सज्जनवार (नाटक- देहभान), तृतीय पारितोषिक ज्ञानेश्वर सोनटक्के (नाटक- विठू रखुमाय) संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक वैभव पाराशर (नाटक- तांडा), द्वितीय पारितोषिक आलेख कोटंरगे (नाटक- कर्नल सरंजामे आणि ती), तृतीय पारितोषिक उत्पल टोंगो (नाटक- भूत झोंबलं तात्याला) वेशभूषाः प्रथम पारितोषिक मुग्धा खत्री (नाटक-तांडा), द्वितीय पारितोषिक आश्विनी निवल (नाटक-फेस टू फेस), तृतीय पारितोषिक निकिता गोरे (नाटक- दि अॅनॉनिमस) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रशांत कक्कड (नाटक-तांडा) व कल्याणी बोरकर (नाटक-तांडा), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अविश बन्सोड (नाटक- श्री नॉट श्री), गौरव सातपुते (नाटक-काळ्या मुलीच मॅरेज), डॉ. अनिरुध्दजीत नरखेडकर (नाटक-फेस टू फेस), डॉ. प्रजेश घडसे (नाटक-कर्नल सरंजामे आणि ती), प्रिया कांडूरवार (नाटक- देहभान), शरयु कुबेर (नाटक- तीन पायांची शर्यत), डॉ. प्रणाली वायकर (नाटक- फेस टु फेस), सुमेधा श्रीरामे (नाटक- कर्नल सरंजामे आणि ती)
दि. ११ नोव्हेंबर, २०२५ ते २९ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. वैभव मावळे, श्री. विजय रावल आणि श्रीमती रुपाली कोंडेवार यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.















