अयोध्येला पाठवणार चंद्रपुरातील सागवान लाकूड, शोभायात्रेत उत्तर प्रदेशचे मंत्री होणार सहभागी

0

 

अयोध्या येथील राम मंदिरासाठी 1800 क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यासाठी 29 मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री तथा अयोध्या राम मंदिरातील पुजारीही सहभागी होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत मंत्री मुनगंटीवार म्हणाले, या सोहळ्यासाठी उद्या सायंकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरला येणार आहेत. महाकाली मंदिरापासून ते पुढचा प्रवास ते यात्रेसोबत करतील. त्यानंतर नागपूरच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील. उत्तरप्रदेशातून काशी विश्‍वनाथ बनारसचे पालकमंत्री रवींद्र जयस्वाल, उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, बलियातून निवडून आलेले वन व पर्यावरण राज्यमंत्री अरुण सक्सेना यांच्यासह खास राम भजनासाठी कैलास खेर उपस्थित राहणार आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा