ठाकरे गट आक्रमक, फडणवीस यांचा पुतळा जाळला

0

नागपूर : नागपुरात भाजपविरोधात आज व्हेरायटी चौकात ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन पहायला मिळाले. संभाव्य खबरदारी म्हणून अतिशय तगडा बंदोबस्त असताना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पोलिसांना गुंगारा देत उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडणे, पुतळा जाळण्यात आल्यामुळे नागपुरात ठाकरे गट आक्रमक झाला.काल भाजपला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी पत्रपरिषदेत दिला होता.ठाकरे गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्यने एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांच्या काही वक्तव्याविरोधात त्यांचा पुतळा जाळण्यात आल्याने ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून आता राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या उपस्थितीत ठाकरेंचा पुतळा जाळल्यानं, होर्डिंग फाडल्याने कार्यकर्ते संतापले. पोलिसात तक्रार केली दोषींवर कारवाईची मागणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश जाधव यांनी बावनकुळे यांनी आम्हाला भ्रष्टाचाराचे सांगू नये, मराठी भाषेचा त्यांनी विचित्र शब्द वापरत अपमान केला. हे भाजपचे राज्य की पोलिसांचे हे स्पष्ट व्हावे, आम्हीही आता संघर्षाला तयार असून पहिला भ्रष्टाचार बावनकुळे यांचाच काढला जाईल असेही ठणकावले. यावेळी जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, शहर प्रमुख नितीन तिवारी, पूर्व विदर्भाचे संघटन प्रमुख सतीश हरडे, हर्षल काकडे, माधुरी पालिवाल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.