बुलढाणा जिल्ह्यात 12 जानेवारी मा जिजाऊंच्या जन्मदिनानिमित्त आयोजित जन्म सोहळ्यास येणाऱ्या देशभरातील जिजाऊ भक्तांना आठ ते दहा किलोमीटरवर बॅरिगेट लावून पोलिसांनी अडवणूक केली.. त्यामुळे लाखो जिजाऊ भक्त जिजाऊंच्या राजवाड्यावर तसेच जिजाऊ सृष्टीवर जिजाऊंना अभिवादन करण्याकरता पोहोचू शकले नाहीत.. यामध्ये गृह मंत्रालयाचा हात असल्याचा आरोप आता जिजाऊ ब्रिगेड कडून करण्यात आला आहे.. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करावे आणि या संपूर्ण षड्यंत्रात आपला हात नसल्याचा सिद्ध करावे अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.. अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराच जिजाऊ ब्रिगेड करून देण्यात आला आहे.. त्यामुळे जिजाऊ जन्म सोहळ्याचा हा वाद शिगेला पोहोचला असून संभाजी ब्रिगेड पाठोपाठ जिजाऊ ब्रिगेडही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.. लवकरात लवकर या संपूर्ण कृत्याला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर राज्यात एक मोठं आंदोलन पाहायला मिळू शकते..
जिजाऊ भक्तांच्या गाड्या अडवल्याचं प्रकरण पेटलं..
Artical Blog
Hindi News
Artical Blog
















