नागपूर : नागपुरात यावर्षीच्या कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनेचा कृती आराखडा नियोजनाबाबत आढावा घेतला.
उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव व्हावा, तसेच नागरिकांनी काळजी घ्यावी याउद्देशाने मनपाद्वारे दरवर्षी उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येतात. शहरात उष्माघातामुळे जीवितहानी होउ नये यासाठी शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानक, दवाखान्यांमध्ये तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी उष्माघात प्रतिबंधासंदर्भात प्रत्येक विभागामध्ये योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात प्रतिबंधक कृती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधून त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत दिले.
यावेळी साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सादरीकरणामार्फत आरोग्य विभागामार्फत दरवर्षी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा आणि सूचना आयुक्तांनी नोंदविल्या. उष्माघाताच्या संदर्भात माहिती, जनजागृती आणि समन्वय योग्यरितेने व्हावे यादृष्टीने आरोग्य विभागासह सर्व विभागांनी कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा आणि सूचना आयुक्तांनी नोंदविल्या. उष्माघाताच्या संदर्भात माहिती, जनजागृती आणि समन्वय योग्यरितेने व्हावे यादृष्टीने आरोग्य विभागासह सर्व विभागांनी कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.