बुलढाणा – संपूर्ण राज्यात जल्लोषात साजरा केला जाणारा गणेशोत्सव यावर्षीपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पत्रकार गणेश उत्सव मंडळाकडून साजरा करण्यात येत आहे. पत्रकार भवन येथे ढोल ताशांच्या गजरात गणरायाची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकाराच्या वेशभूषेत ही बाप्पांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मुर्तीच्या एका हातात पेन, पॅड, इलेक्ट्रॉनिक बूम, कॅमेरा देण्यात आला असून ही मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. हा उत्सव पाच दिवस साजरा करण्यात येणार असून यामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेतले जाणार आहेत.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















