भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला

0

नागपूर : पुणे शहरातील भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनातील बैठकीत केल्या. तर वॉर फुटिंगवर काम करून मनपा आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने नियोजन करून हे काम मार्गी लावावे असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. दोन महिन्यात याचे भूमीपूजन होईल असे आदेश दिले. त्यामुळे भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती त्यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.भुजबळ पुढे म्हणाले की, की,‘पुणे येथील भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी काल दिवसभर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते भिडेवाड्याच्या समोर उपोषणाला बसलेले होते.

ही ऐतिहासिक वास्तू पुणे महानगरपालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेवून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने दि. २१ फेब्रुवारी २००६ रोजी ठराव क्र. ५५७ अन्वये ठराव मंजूर केलेला आहे. भिडेवाडयात पुणे महानगरपालिकेच्या वतीने ‘सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा’ सुरु करण्याचा दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शासनाने निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी ‘सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा’ सुरु करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, शासनाने या जागेवर उपलब्ध चटईक्षेत्र निर्देशांक विशेष बाब म्हणून नियम शिथिल करून वाढीव अथवा मेट्रोमर्गिका करीताचा चटईक्षेत्र निर्देशांक अधिकचा मंजूर करून आताच्या सर्व भाडेकरूंचे पुनर्वसन नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यांवर किंवा एक मजल्यावर करता येईल. अतिरिक्त चटई क्षेत्र वापरून उपलब्ध होणार्‍या उर्वरित मजल्यांच्या बांधकामात ‘सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा’ करण्यात येईल. महानगरपालिकेने (जागा संपादनासाठी होणार्‍या अनावश्यक खर्चाच्या बचतीतून व शासनाचे अतिरिक्त अनुदान) यातून करावे. यामुळे भाडेकरूंचे नुकसान न होता किमान खर्चात चांगले स्मारक होऊ शकेल असेही ते म्हणाले.