Home Top News मोबाईलवर बोलत असल्याने आई ओरडली, मुलीने मध्यरात्री घर सोडले

मोबाईलवर बोलत असल्याने आई ओरडली, मुलीने मध्यरात्री घर सोडले

0

नांदेड -अलीकडे अल्पवयीन मुलामुलींचा स्क्रिनटाईम भलताच वाढला आहे. त्यात अन्य सोशल मिडियाच्या तुलनेत इन्स्टाग्रामवर तासनतास वेळ घालवले जातात. मोाबईलसाठी हटकल्याने घर सोडून जाणारेही कमी नाहीत. अल्पवयीन मुले-मुली घरातून पळून जातात, त्यामागे मोबाईल व त्यावरील सोशल मिडियाचा अतिरेक सर्वाधिक कारणीभूत ठरला आहे. अशी एक घटना नांदेड वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. मोबाईलवरून आई बोलल्याने एका अल्पवयीन मुलीने घर सोडले आहे.
मोबाईलवर बोलत असल्याने तिच्या आईने तिला रागावले, परिणामी ती मुलगी रागाच्या भरात मध्यरात्री बाहेर पडली. मात्र कुठे जायचे हे निश्चित नसल्याने ती शहरातील हिंगोली गेट येथे एकटीच फिरू लागली. त्याच दरम्यान वजीराबाद पोलीस ठाण्याचे नाईट पेट्रोलिंग करणा-या पोलीस कर्मचारी गणपत बुरफूले यांच्या नजरेस पडली. गणपत बुरफूले यांना संशय आल्याने त्यांनी त्या मुलीची विचारपुस केली असता, ती मुलगी काही सागंत नसल्याने त्यांनी त्या मुलीला वजीराबाद ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक प्रवीण आगलावे यांच्या ताब्यात दिले. दरम्यान या मुलीला महिला पोलीसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र ती सुरवातीला काही बोलली नाही. पण आशा नारळे व मिनाक्षी असरगोंडे यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचाल्याने तिने तिचे नाव व आई वडीलांची माहिती सांगितली. दरम्यान या मुली सोबत शाळेचे ओळख पत्र असल्याने पोलीसांनी तात्काळ शाळेतील मुख्याध्यापकाशी संवाद साधला व मुख्यध्याकांनी मुलीची ओळख असल्याचे सागून त्यांनी मुलीच्या पालकांशी संवाद साधून ते सर्व पोलीस ठाण्यात आले.