विविध मागण्यांसाठी ‘आफ्रोह संघटने’ चे राज्यव्यापी नारे निदर्शने आंदोलन

0

 

वर्धा- आज आफ्रोहच्या वतीने विविध मागण्यांसाठी नारे निदर्शने आंदोलन पुकारण्यात आले. अनुसूचित क्षेत्रातील (TSP) अनु. जमातीप्रमाणेच OTSP तील आदिवासींना जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावेत, तसेच TSP आदिवासींच्या सर्व योजना OTSP तील आदिवासींना लागू करा. जर न्याय मिळत नसेल तर विस्तारीत क्षेत्रातील ३३ अनु. जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्या १४ बोगस आदीवासी आमदार व २ बोगस आदिवासी खासदार यांना हटवा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती अशोक हेडाऊ, जिल्हाध्यक्ष आफ्रोह यांनी दिली.