आगामी वर्षात नवे शिक्षण धोरण राज्यात लागू होणार – दीपक केसरकर

0

 

पंढरपूर – आगामी वर्षात नवे शिक्षण धोरण राज्यात लागू होणार आहे. यामध्ये बालवाडी ते नववी- दहावीच्या वर्गांचा समावेश असणार आहे. यासोबतच लवकरच नवीन शिक्षक भरती देखील होईल असे वक्तव्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. राज्याचे शिक्षण मंत्री कोण ? असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले, त्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राणे साहेब आमचे नेते आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. अशा शब्दात राणेंच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे आज पंढरपूरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्यावर केलेल्या टिकेबद्दल आपण पंढरपूरच्या मंदिरामध्ये आहोत , संजय राऊत यांचे नाव घेऊ नका , संजय राऊत यांनी तोंड उघडले की…. अशा शब्दात राऊत यांचा खरमरीत समाचार घेतला.