नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त पोलिसांनी उधळला घातपाताचा डाव

0

गडचिरोली. सततच्या कारवायांमुळे पूर्व विदर्भातील (East Vidarbha ) नक्षली चळवळ पुरती खिळखिळी झाली आहे. विदर्भातील नक्षली चळवळीचे केंद्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यांतील (Gadchiroli districts) नक्षलवादी कारवायांही थांबविण्यात यश आले होते. दीर्घकाळ थंडबस्त्यात गेलेल्या चळवळीला पुन्हा जीवंत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यानिमित्ताने नक्षलवाद्यांची सक्रियता दिसून येत आहे. अलिकडेच नक्षल्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या केली होती. त्यानंतर आता जमिनीत स्फोटके पेरून मोठा घतपात घडविण्याचेही प्रयत्न नक्षलवाद्यांकडून सुरू झाले आहेत. भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके शोधण्यात विशेष अभियान पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. ‘टीसीओसी’च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात धडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला (The Naxalites’ plan was thwarted) आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडतानाच चिंता व्यक्त केली आहे.
टीसीओसीच्या पार्श्वभूमीवर प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान काल सकाळपासून नेलगुंडा परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. त्यांना जमिनीत स्फोटके आढळून आली. तीन वायर बंडल, बॅटरी, डेटोनेटर इत्यादी साहित्य पोलिसांनी शिताफीने बाहेर काढून बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने ही स्फोटके नष्ट करण्यात आली. यामुळे मोठा घातपात टळला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे मनसुबे पुन्हा एकदा ध्वस्त झाले आहेत.