पदवीधरमध्ये 8 जागांवर अभाविपचा झेंडा सीनेट निवडणूक : मविआ, युवा ग्रॅज्युएट फोरमला प्रत्येकी 1 जागा

0

नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj of Nagpur University) पदवीधर सीनेटच्या निवडणूकीत (Graduate Senate Elections ) भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्याथीं परिषदेने (ABVP) झेंडा रोवला आहे. विद्यापीठाच्या गेल्या पदवीधरांच्या निवडणुकीत अभाविप, महाविकास आघाडी तसेच परिवर्तन पॅनेलला संमिश्र यश मिळाले होते. यावेळी मात्र अभाविपने सर्वांना सपाटून टाकले. पदवीधर प्रवर्गातील 10 पैकी तब्बल 8 जागांवर अभाविपने झेंडा रोवला आहे. महाविकास आघाडी आणि युवा ग्रॅज्युएट फोरमला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, महाविकास आघाडी व तरूणांसाठी लढा देणाऱ्या इतर संघटनांमध्ये निरूत्साह पसरला आहे. या निवडणुकीच्या राखीव प्रवर्गातील सर्व पाच जागांवर अखिल भारतीय विद्याथीं परिषदेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला. त्यापाठोपाठ आता खुल्या प्रवर्गातील 5 पैकी 3 जागांवरही विजय संपादन केला आहे.
या निवडणुकीने महाविकास आघाडी, एकीबेकीचे विद्याथींकरण करणाऱ्या दोन संघटनांनाही मोठा हादरा बसला आहे. पदवीधराच्या 10 जागांसाठी 51 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील पाच राखीव जागांवर अभाविपने बाजी मारली. प्रथमेश फुलेकर (अनुसूचित जाती), सुनील फुडके, दिनेश शेराम ( अनुसूचित जमाती), वामन तुर्के ( विमुक्त जाती), रोशनी खेळकर (महिला राखीव) विजयी झाले. बुधवारीच हे निकाल स्पष्ट झाले होते. खुल्या प्रवर्गाची मतमोजणी मात्र सुरूच होती. आता या जागांचेही निकाल जाहीर झाले आहे. खुल्या प्रवर्गातून अभाविपचे विष्णू चांगदे, मनीष वंजारी, अजय चव्हाण यांनी बाजी मारली. याचप्रमाणे महाविकास आघाडीचे अड. मनमोहन बाजपेई आणि युवा ग्रॅज्युएट फोरमचे राहुल हनवते यांनी विजय मिळविला आहे.

कमी मतदानाचा ‘अभाविप’ला फायदा
या निवडणुकीत केवळ 22 टक्केच मतदान झाले. एकूण 60 हजारांवर मतदार होते. पैकी केवळ 12ते 13 हजार मतदारांनीच मतदान केले. तरूण व सुशिक्षीत असतानाही मतदार मतदानासाठी गेले नाहीत, हे या निवडणुकीचे अपयश मानले जाते. मविआ व दोन्ही आघाडयांनी त्यांचे मतदार बाहेर काढले नाहीत. उलटपक्षी, अभाविपने व्यूहरचना करीत त्यांचे मतदारांना बाहेर काढून कमी का होईना मतदान करवून घेतल्याने त्यांना किमान विजय मिळविता आला. उत्साहात मतदार नोंदणी करून आपण विजयी होणार असा अतिआत्मविश्वास कायम नडतो. तो यावेळीही मविआ व दोन्ही संघटनाला नडला.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा