नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत नागपूर शहरातील विविध प्राधिकरणांच्या प्रलंबित विषयांचा नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी शुक्रवारी आढावा घेतला.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहामध्ये मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो आणि नागपूर स्मार्ट सिटीची बैठक घेतली. बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे प्रामुख्याने उपस्थित होते.