रत्नागिरी- बीपरजोय वादळ गुजरातच्या दिशेने निघून गेले असले तरी त्याचा जो प्रभाव आहे तो कोकण किनारपट्टीवर सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून कोकणासह रत्नागिरीतले समुद्रकिनारे हे खवळलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या अगोदर अनेक चक्रीवादळे झाली पण या वादळाचा एवढा परिणाम दिसला नाही. रत्नागिरीतील स्थानिक मच्छीमार देखील सांगतात की , असा प्रकार या अगोदर कधी घडला नव्हता. गेल्या पाच दिवसांपासून कोकणासह रत्नागिरीतले समुद्रकिनारे हे खवळलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. अजून ४ ते ५ दिवस समुद्राची अशीच स्थिती राहणार असल्याचे देखील त्यांचे मत आहे.