फुकटची दारू ढोसून चोर तिथेच झोपला, सकाळी लोकांनी चांगलाच धुतला

0

नेरमधील अजब घटना ; पोलिसांनी केली अटक
नेर. यवतमाळ जिल्ह्यातील नेर (Ner in Yavatmal district ) शहरातून अजबच घटना समोर आली (strange incident happened ) आहे. एक चोरटा बीयरबारमध्ये चोरीसाठी शिरला. पण, केवळ २६०० रुपयेच त्याच्या हाती लागले. त्यावर समाधान न मानता तो मद्यालयातील बाटल्यांना भुलला. मनसोक्त दारू ढोसली. व्हायचे तेच झाले. दारूच्या धुंदीने चोरट्याला निघून जाण्याचेही भान राहिले नाही. तिथेच झोपून राहिला. सकाळी अलगद नागरिकांच्या तावडीत सापडला. मग काय विचारता? सर्वांनी मिळून धो-धो धुतला आणि त्याला पोलिसांच्या (Police) तावडीत दिले. सध्या याच घटनेची अवघ्या नेर शहरात चर्चा सुरू आहे. हा सारा प्रकार अमरावती रोडवरील एका बीयरबारमध्ये घडला. तेजेस पंडित गणवीर (२०) रा. नबाबपूर असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
त्याने रात्री जुन्या बसस्थानकावरील राज वाईनबारमध्ये काच फोडून चोरी केली. गल्ल्यातील नगदी २६०० रुपये त्याच्या हाती लागले. त्यानंतर त्याने दारूच्या सहा बाटलही चोरल्या. पण, समोर दारूची रास बघून त्याला रहावले नाही. ऐथेच्छ दारू ढोसली. दारूची झिंग इतकी भारी चढली की, तो तेथेच झोपला. सकाळी बीयरबारचे मालक सुदीप अशोक जयस्वाल दुकानात आले. त्यावेळी त्यांना बीयरबारच्या काचा फुटलेल्या दिसल्याने चोरीची शंका आली. आत जाऊन पाहीले तर चक्क चोरटाच तेथे झोपलेला होता.
मालकाला बघून तो पळ काढण्याच्या तयारीत होता. परंतु, मालकाने आरडाओरड केल्याने नागरिक गोळा झाले आणि त्यांनी चोरट्याला जागेवरच चोपला. धुलाई केल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. जमादार सुभाष ठाकरे, नीलेश सिरसाट, सचिन फुंडे यांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून तेजेस पंडितवर भादंवी ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
गावांत भरू लागले जुगार अड्डे
मोठ्या शहरांमध्ये पोलिसांचा दबदबा वाढला आहे. यामुळे जुगार खेळणाऱ्यांनी गावाची वाट धरली आहे. आता खेडे गावांतील घरांमध्येही जुगाराचे अड्डे भरू लागले आहे. महागाव तालुक्यातील सवना येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. सुनील बारस्कर (३३), सय्यद रहीम सय्यद इब्राहीम (३५), दत्ता जाटवा (३८), विजय दत्तराव माने (४२), संतोष मनवरे (४६), गोपाल मेहलडे (३८), सचिन जांभूळकर (३२), पंडित पवार (३५), शंकर दासरकर (५२), माधव मेंढके (५१) आणि धम्मपाल खाडे (४२) सर्व रा. सवना अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व सवना येथील वाॅर्ड क्र. ४ मधील एका घरी एका-बादशाह नावाचा जुगार खेळत होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा