अयोध्येतील राम मंदिराच्या तळमजल्याचे काम वर्षाअखेर पूर्ण होणार

0

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर असून ते 45 टक्के पर्यंत पूर्ण झाले (Ram Mandir Construction in Ayodhya)असून मंदिराच्या तळमजल्याचे काम 2023 च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल आणि मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या मजल्याचे काम त्यानंतरही किमान ९ महिने सुरुच राहील, अशी माहिती या प्रकल्पाचे बांधकाम व्यवस्थापक जी. सहस्त्रभोजनी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलीय. राम मंदिराचे उर्वरित बांधकाम 2024 च्या नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत पुर्ण होण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. या मंदिरात गर्भगृहातील श्रीरामाची मूर्ती नेमकी कशी असावी, यावर सध्या चर्चा सुरु असून लवकरच त्यावर निर्णय होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राम मंदिराच्या निर्मितीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

अयोध्या येथील रामजन्मभूमी स्थळावर बांधकाम प्रगतीपथावर असून आतापर्यंत मंदिराचे एकूण ४५ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे प्रकल्पाचे बांधकाम व्यवस्थापक सहस्त्रभोजनी यांनी सांगितले. मंदिरासाठी उभारण्यात येत असलेल्या सर्व खांबांवर हस्तकलेच्या 16 शिल्पकृती मानवी आकृत्या राहणार असून त्या तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मंदिर भाविकांसाठी खुले केल्यानंतरही खांबांवर शिल्पकृतींचे काम सुरूच राहणार आहे. अयोध्येचा काही भाग उच्च तीव्रतेच्या भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने मंदिराची रचना देखील त्या दृष्टीने भक्कम स्वरुपात केली जात आहे. शरयू नदीमुळे या काही भागात जमीन खचल्याने मंदिराचा पाया भक्कम करण्यात आला असून तो पुढील हजार वर्षे भक्कम राहील, या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सहस्त्रभोजनी यांनी सांगितले.


दरम्यान, विहिंपचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, मंदिराच्या गर्भगृहाच्या परिसरातील भिंती तयार झालेल्या आहेत. गर्भगृहासाठी पांढऱ्या रंगाच्या मकराना दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरातील मूर्तीची रचना कशा पद्धतीची असावी, त्यासाठी कोणत्या दगडांचा वापर करावा, यावर सध्या चर्चा सुरु आहे. मंदिरासाठी भगवान श्रीराम यांची शिशू अवस्थेतील मूर्ती तयार करण्याचा निर्णय होऊ शकतो, असेही संकेत मिळत आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा