-रोज 500 लोक सोडताहेत देश
दिल्ली : गेल्या अकरा वर्षात सोळा लाखाहून अधिक जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. याचाच अर्थ दररोज 400 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले, आणि आता तर हे प्रमाण रोज 500 पर्यंत गेल्याची धक्कादायक बातमी आहे. ( Lok Sabha by Central Govt )केंद्र सरकारने लोकसभेत याविषयीची आकडेवारी जाहीर केली. आता सरकारमार्फत विदेशात राहणाऱ्या भारतीयांना जोडण्याच्या दिशेने भक्कमपणे प्रयत्न केला जात आहे. या निमित्ताने हे वास्तव पुढे आले. दरवर्षी 1.80 लाख लोक भारतीय नागरिकत्वाचा त्याग ( Renunciation of Indian citizenship ) करून विदेशात स्थायिक होत आहेत. भारतीयांची सर्वाधिक पसंती असलेले देश याविषयी बोलायचे झाल्यास अमेरिका प्रथम क्रमांकावर असून ( Canada ) कॅनडा दुसऱ्या तर ( Australia ) ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. ( In 11 years, 16 lakh people renounced Indian citizenship )
55 हजार नागरिक दरवर्षी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारतात. देशात वाढणारे अपराध व व्यवसायासाठी असलेली अल्प संधी, महिला व मुलांना हवे असेलेले सुरक्षिततेचे वातावरण, आधुनिक जीवनशैलीची आवड आणि प्रदूषण मुक्त हवा, कमाईच्या अधिक संधी आणि किमान कर प्रणाली, परिवारासाठी अधिकाधिक चांगल्या आरोग्य सुविधा याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी यातील बहुतांशी लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.
यातून अर्थातच देशाचे देखील नुकसान होत आहे श्रीमंत उद्योगपतींनी आपले बस्तान देशाबाहेर बसवले आहे. गेल्या दशकातील आकडेवारीचा विचार करता सन 2011 साली एक लाख 22 हजार 819 जणांनी देश सोडला 2012 मध्ये हे प्रमाण एक लाख वीस हजार 923, 2013 साली एक लाख 31,405 लोकांनी देश सोडला, 2014 मध्ये एक लाख 29 हजार 328 लोकांनी देश सोडला, 2015 या वर्षी एक लाख 31 हजार 489 तर 2016 साली एक लाख 41 हजार 603, 2017 साली एक लाख 33 हजार 49, 2018 मध्ये 134,569, 2019 साली 144,017, 2020 मध्ये 85 हजार 256 हे प्रमाण काहीसे कमी राहिले 2021 साली मात्र यात झपाट्याने वाढ झाली. ही आकडेवारी एक लाख 63 हजार 370 वर पोहोचली तर 2022 म्हणजे गतवर्षी हे प्रमाण सर्वाधिक 184,741 असे आहे.