तीन रेल्वे गाड्यांची धडक,50 हून अधिक प्रवासी मृत्युमुखी, 300 प्रवासी जखमी

0

 

 

भुवनेश्वर: ओडिशात बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि मालगाडी अशा तीन रेल्वेगाड्या आदळून झालेल्या भीषण अपघातात 50 हून अधिक (Coromandel Express Accident) प्रवासी मृत्युमुखी पडले तर सुमारे तीनशे प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तीन गाड्यांची धडक इतकी जोरदार होती की, दोन गाड्यांचे 17 डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. यातील कोरोमंडल एक्स्प्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा येथील शालिमार स्टेशनवरून चेन्नईला रवाना झाली होती. ती ओडिशातील बहनागा स्थानकाजवळ आल्यावर कोरोमंडल एक्स्प्रेस, दूरंतो एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक झाली. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसचे 17 डब्बे रुळावरून खाली घसरले. ही माहिती मिळताच बचावकार्यचं पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदी यांनी अपघाताची माहिती घेतली व मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.