तीन वर्षाच्या बाळाला जीवदान

0

 

‘मल्टिलेव्हल डायस्टोमॅटोमिया व टिथर कॉर्ड’ या दुर्मिळ विकारावर शस्त्रक्रिया
नागपूर. तीन वर्षाचे बाळाच्या मज्जारज्जूत जन्मतः हाडनिर्मिती झाल्याने हळूहळू पायाला अपंगत्व येत होते, मलमुत्र विसर्जन अनियंत्रित झाले होते. डॉ. प्रमोद गिरी यांनी त्याचे निदान जगातील दुर्मिळ आजारांपैकी एक ‘डायस्टोमॅटोमिया व टिथर कॉर्ड’ हे स्प्लिट कॉर्ड मालफार्मेशन प्रकारातील विकार असे केले व त्या बाळाची शस्त्रक्रिया करून मज्जारज्जूत वाढलेले अतिरिक्त हाड शस्त्रक्रियेद्वारे काढले. (Surgery for the rare disorder ‘Multilevel Diostomy and Tether Cord ) वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध जर्नल ऑफ क्लिनिकल इमेजिंग सायंसच्या मेडिकल लिटरेचर नुसार ही अशा प्रकारची जगातील दुसरीच केस (second surgery in the world) असल्याचा दावा करण्यात येत आहे. डॉ. गिरी यांनी त्याचे योग्य निदान आणि त्यावर उपचार केल्याने बाळाचे दीर्घकालीन अपंगत्व टळले असून बाळाला नवायुष्य प्राप्त झाले आहे. बाळाच्या पालकांनी डॉ. गिरी यांचे आभार मानले आहे.
तीन वर्षाच्या बाळाच्या पाठीच्या खालील भागात जन्मतःच केसांचा पुंचका व गाठ होती. शिवाय पाठीचा कणा तिरपा होणे सुरू झाले होते व पायात अशक्तपणा, उभे राहण्यास व चालण्यास असमर्थता आणि मलमुत्र विसर्जनावर नियंत्रण गमावल्या जात होते. डॉ. प्रमोद गिरी यांनी ‘डायस्टोमॅटोमिया व टिथर कॉर्ड’ अशा अत्यंत दुर्लभ विकाराचे निदान केले. यामध्ये रुग्णाच्या मेंदूतून निघालेल्या मुख्य मज्जारज्जूच्या आत हाडाची निर्मिती होते. त्यामुळे हळूहळू मज्जातंतूचे कार्यान्वयन बिघडून रोजच्या जीवनातील गतिविधी करू शकत नाही. विशेष म्हणजे या बाळाला मज्जारज्जूत दोन ठिकाणी डी-१२ आणि एल-३ या अशा दोन पाठीच्या मणक्याच्या हाडातील मज्जारज्जूत अतिरिक्त हाड निर्माण झाले होते. एरवी हा विकार सामान्यतः आढळू शकतो. मात्र, एकाच वेळी पाठीच्या दोन्ही मनक्यात आणि त्याच वेळी दोन्ही ठिकाणी अतिरिक्त हाड निर्माण झाले होते. अशा प्रकारची ही जगात नोंदविल्या गेलेली दुसरीच केस आहे.
बाळाची प्रकृती आता उत्तम असून तिचे पुढील जीवन सामान्य असेल. जर वेळेत निदान व योग्य उपचार झाले नसते तर दीर्घकालीन अपंगत्वाची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉ. प्रमोद गिरी यांनी सांगितले. प्रा. डॉ. प्रमोद गिरी हे मध्य भारतातील अग्रगण्य व रोबोटिक रिहॅबिलिटेशनची सोय असलेल्या मेंदूरोगावरील विशेष न्युरॉन हॉस्पिटलचे संचालक आहेत. त्यांनी आतापर्यंत १५ हजाराहून अधिक स्पाईन सर्जरी केल्या असून मेडिकल लिटरेचरमध्ये पहिल्या व दुसर्‍या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे.
वेळेत उपचारांनी टळेल अपंगत्व
जन्मतः केसपुच्छ, मोठा डाग किंवा काहीतरी असामान्य असल्यास स्प्लिट कॉर्ड मालफार्मेशन असू शकते. असे बाळ तीन-चार वर्षे वयानंतर येतात; जेव्हा अचानक त्यांचं चालणे बंद होते. वेळेत निदान आणि योग्य उपचारांनी भविष्यातील अपंगत्व टाळू शकतो. बच्चूच्या या दुर्मिळ आजारावर उपचार करण्याचे समाधान लाभले.
प्रा. डॉ. प्रमोद गिरी, मेंदूरोग शल्यचिकित्सक, नागपूर

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा