‘वेव्हजऑफ मेलोडीज -२’ संगीतमय कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
नागपूर – ‘इश्क सुफियाना’, मेरे रशके कमर, तेरी ओर, पिया हाजी अली, मायी तेरी चुनरिया या आणि अश्या बहारदार गीतांच्या सादरीकरणाने ‘वेव्हजऑफ मेलोडीज -२’ संगीतमय कार्यक्रमात तरूणाईला ठेका धरायला लावला. भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय, नई दिल्ली व रंगभुमी, नागपूर यांच्या सयुक्त विद्यमाने युफोनी इव्हेंटस आयोजित वेव्हज ऑफ मेलोडीज -२ संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर इथं सोमवारी करण्यात आले.
स्टार गायक आणि द व्हॉइस (स्टार प्लस ) आणि इंडिया के मस्त कलंदर फेम (सब टीव्ही ) हामिद हुसेन यांनी वरील गाणी म्ह्णून रॉकिंग परफ़ॉर्मन्स दिला आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी संजय हेडाऊ आणि रुही खान यांनी ‘दिल तो पागल है’, साक्षी त्यागी यांनी ‘यारा सिली सिली’, दिनेश जाधव यांनी ‘आजकाल याद कुछ’, गीता राजगोपालन ‘ ऐ दिल मुझे बता’, नूतन सिंग यांनी ‘भिगी भिगी ऋत’, रजनी हुद्दा ‘ यांनी शोखियों मी घोला जाए’, शकील कुरेशी ‘ जाणे कहां गाये वो दिन’, प्रशांत बोरकर आणि उज्ज्वला बोरकर यांनी ‘ हमी तो तेरे आशिक है’ , श्रीकांत साबळे यांनी व मेरी जान ‘, अरुण मेहरुलिया यांनी शायद तू मुझसे प्यार कार्टी है’, यश पंढी यांनी ‘ मै शायर तो नही’, धनश्री भगत यांनी हम उनसे मुहब्बत करते’, तुषार रंगारी यांनी जाती हू मै’ यांच्यासह राखी बोबडे, गीता राजगोपालन या गायक मंडळीने सुश्राव्य गीते प्रस्तुत केलीत. ध्वनी नियोजन वाहिद भाई यांचे तर संगीत नियोजन महेंद्र ढोले यांचे होते. सूत्रसंचालन समृद्धी कळाशिलकर यांनी केले.
आयोजक विलास कुबडे यांनी कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल गायक मंडळी आणि श्रोत्यांचे आभार मानले आहे. दरम्यान कार्यक्रमात सुनीता गजभिये, सचिव – रशुद्दी बहुउद्येशिय सामाजिक शिक्षण संस्था, नागपूर,श्री धनराज मोटे, अध्यक्ष – प्रदूषण नियंत्रण व नागरी स्वास्थ संवर्धन बहुउद्देशीय संस्था नागपूर श्री मनीष भिवगडे, अध्यक्ष- मानवशांती सांस्कृतिक प्रतिष्ठान, कन्हान श्री कालीचरण शेंडे, सचिव – ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था, विहीरगाव श्री रामदास माने राव, सचिव अजित बालक मंदिर, वाडी – श्री अशोक लोणारे, अध्यक्ष – मागासवर्गीय गोपाल समाज कल्याणकारी संस्था, माहूरझरी यांची विशेष उपस्थिती आणि सहभाग लाभला. कार्यक्रमाची संकल्पना रूही खान यांची होती तर नदीम खान आणि विलास कुबडे यांचे विशेष सहकार्य लाभले.