आज जागतिक कर्करोग दिन

0

दरवर्षी ४ फेब्रुवारी जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. हा खास दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक करणे हा आहे.विविध प्रकारच्या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. तोंडाचा कर्करोग हा देखील असाच एक झपाट्याने वाढणारा धोका आहे. भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजेच ‘कॅन्सर’. मात्र, आजही कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जागृकता नसल्याचं दिसून येतं. कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. प्राणघातक आणि धोकादायक आजाराबद्दल लोकांमध्ये जागृकता असणं आवश्यक आहे.

कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर या आजारावरही मात करता येऊ शकते. यामध्ये आज औषधोपचार आणि निदान पद्धतीमध्येही मोठे बदल झाल्याने अनेकांचं जीवन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मदत होत आहे.4 फेब्रुवारी 2000 रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे न्यू मिलेनियमसाठी जागतिक कर्करोग परिषदे दरम्यान झाली. त्याच दिवशी, युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोइचिरो मत्सुरा आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक शिराक यांनी कॅन्सर विरुद्ध पॅरिसच्या चार्टरवर सही केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

कर्करोग म्हणजे काय?

  • कर्करोग हा असा आजार आहे, ज्यामध्ये जेव्हा शरीरातल्या सामान्य पेशींच्या गटामध्ये बदल होतो तेव्हा त्या पेशींची अनियंत्रित, असामान्य वाढ होते आणि शरीरात गाठी तयार होतात. ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) वगळता इतर सर्व कर्करोगाबाबत हे सत्य आहे.
  • कर्करोगामुळे पेशी अनियंत्रितपणे विभाजित होतात. त्यामुळे गाठी (ट्यूमर) तयार होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि इतर दुर्बलता देखील येऊ शकतात जी प्राणघातक असू शकते.

कर्करोगासंबंधी जागतिक दृष्य

  • दरवर्षी जगभरात जवळपास 9.6 दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो.
  • सामान्य कर्करोगांमध्ये आढळून येणारे किमान एक तृतीयांश प्रकार प्रतिबंधित केले जाऊ शकते.
  • कर्करोग हा जगभरात होणार्‍या मृत्यूसाठी दुसरा अग्रगण्य कारक आहे.
  • 70% कर्करोगासंबंधी मृत्यू कमी-ते-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.
  • कर्करोगाचा एकूण वार्षिक आर्थिक खर्च अंदाजे USD 1.16 लक्ष कोटी (ट्रिलियन) एवढा आहे.
    ▪️
  • कर्करोगाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) ही संस्था निरंतर कार्यरत आहे. त्यांच्या सूचनेनुसार, – सर्वप्रकारच्या कर्करोगामध्ये सुमारे एक तृतीयांश प्रकार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून अधिकाधिक शारीरिक कामे करून आणि बैठे काम कमीतकमी करून रोखले जाऊ शकतात. मोठ्या संख्येने असेही दिसून आले आहे की उपचारादरम्यान किंवा त्यानंतर व्यायामामुळे चांगले परिणाम दिसून येतात.
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा