आजचे पंचांग ३ जून 2023

0

आज शनिवार, जून ३, २०२३ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर ज्येष्ठ १३ शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१३
चंद्रोदय : १८:३५ चंद्रास्त : ०५:४९, जून ०४
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्दशी – ११:१६ पर्यंत
नक्षत्र : विशाखा – ०६:१६ पर्यंत
क्षय नक्षत्र : अनुराधा – ०५:०३, जून ०४ पर्यंत
योग : शिव – १४:४८ पर्यंत
करण : वणिज – ११:१६ पर्यंत
द्वितीय करण: विष्टि – २२:१७ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : ०९:१८ ते १०:५८
गुलिक काल : ०६:०० ते ०७:३९
यमगण्ड : १४:१६ ते १५:५५
अभिजितमुहूर्त : १२:१० ते १३:०३
दुर्मुहूर्त : ०६:०० ते ०६:५३
दुर्मुहूर्त : ०६:५३ ते ०७:४६
अमृत काल : १९:११ ते २०:४२
वर्ज्य : १०:०४ ते ११:३५

 

घटना

१८१८: मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.
१८८९: ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
१९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
१९४०: डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
१९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
१९५०: मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९७९: मेक्सिकोच्याअखातात इहटॉक या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
१९८९: थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.
१९९८: जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.

 मृत्यू

• १९३२: उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट, १८५९)
• १९५६: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन. (जन्म: १८ मार्च , १८८१)
• १९९७: चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर,१९१६)
• २०१०: मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर , १९५९)
• २०१३: जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)
• २०१४: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर,१९४९)

जन्म

१८९० : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी , १९५४)
१८९०: भारतरत्‍न खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी , १९८८)
१८९२: लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर, १९८६)
१८९५ : पणिक्कर, कोवलम माधव भारतातील एक राजकीय मुत्सद्दी व इतिहासाचे अभ्यासक पणिक्कर, कोवलम माधव यांचा जन्म ( मृत्यू : ११ डिसेंबर १९६३ )
१९२४: तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट,२०१८ )