ओडिशा रेल्‍वे अपघात मृतकांना जनआक्रोशतर्फे श्रद्घांजली

0

 

नागपूर -ओरिशातील बालासोर जिल्‍ह्यातील भीषण रेल्‍वे अपघातात 288 लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक लोक गंभीररित्या जखमी झाले. या मृतात्‍म्‍यांना जनआक्रोश- फॉर बेटर टुमारो संस्‍थेतर्फे व्‍हेरायटी चौक,सीताबर्डी येथे श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. यावेळी हातात फलक घेऊन सुरक्षा नियमांचे आवर्जून पालन करण्याचा संदेश देण्यात आला.
रेल्वे असो वा रस्ते, अपघात होऊ नये म्हणून सतर्क, सजग राहणे आणि सर्व सुरक्षा विषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जनजागृती आम्ही करीत आहोतच परंतु रस्ते सुरक्षा हा विषय गंभीरसून त्या विषयी प्रत्यकाने प्रयत्न करायला हवा असे मत जनआक्रोशचे सह सचिव, संजय डबली यांनी व्यक्त केले.
एका मानवी चुकीमुळे झालेल्‍या या रेल्‍वे अपघातात अनेक संसार उध्‍वस्‍त झाले, अनेकांचे जीव गेले, अनेकांना कायमचे अपंगत्‍व आले आहे. अशाच चुकांमुळे रस्‍ते अपघातातदेखील दररोज सुमारे 400 लोक मारले जात आहेत, हजारो लोक जखमी होत आहेत. या श्रद्धांजली सभेच्‍या माध्‍यमातून असे अपघात होऊ नयेत, यासाठी जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला जनआक्रोशतर्फे दत्तात्रय कुळकर्णी यांच्यासह जनआक्रोशचे कार्यकर्ते -सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

[td_smart_list_end]