अमरावती AMRAWATI : कोल्हापूर KOLHAPUR येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने काही समाज कंटक हे हेतुपुरस्पर तसोशल मिडीयावर खोटया अफवा प्रसारित करुन जातीय, धार्मिक तणाव निर्माण करुन येथील जातीय सलोखा नाहीसा करुन शहरातील शांतता भंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी सोशल अलर्ट जाहिर केला आहे.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांनी अमरावतीकरांनी खोटया अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे. कुणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे, शांतता भंग करणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ पसविणारे आक्षेपार्ह व मॅसेज, इतर सोशल मिडीया माध्यमांवर पोस्ट अथवा प्रसारित करणे, त्याला लाईक किंवा शेअर करणे अशा अफवेवर विवादीत टिप्पणी किंवा कमेंट्स करणे अशा बेकायदेशिर कृती करु नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे