नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे विचार कुणाला काही पटत नसतील तरी आमच्या राज्यात कोणालाही त्रास होणार नाही. हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे नव्हे भाजप-सेनेचे सरकार असून एवढी काळजी आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच घेतील असे मत भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. अमरावतीला जाण्यासाठी आले असता विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.
अमरावतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष झाल्यानिमित्त कार्यक्रम, विविध मेळावे आहेत. पक्षामार्फत प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या अंतर्गत हा दौरा आहे असे राणे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली.अनेकांच्या जीवाला धोका असला तरी सुरक्षा नव्हती, त्या काही गोष्टी आम्ही करणार नाहीत. शरद पवार यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. संजय राऊत यांना देखील धमकी आली आहे पण आता मच्छर मारण्यासाठी कोणाला धमकी देण्याची गरज नाही पायाचा बूट हलवला तरी मच्छर मरतो असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. दुसरे सुनील राऊत त्यांना धमकी कोणाकडून आली हे विचारा कारण मी ऐकले आहे की, मुंबईतील एक डॉक्टर महिला ही संजय राऊत यांच्या मागे पडली आहे.कारण संजय राऊत हे धमकी द्यायचे त्या डॉक्टर महिलेकडून तर संजय राऊत यांना धमकी नाही ना याचे उत्तर संजय राऊत यांनीच द्यावे. 2024 ला विनायक राऊत खासदार नसणार आणि संजय राऊत बाहेर नसणार मग सत्ता कुठून येणार उगीच त्यांनी नाक्यावर बसून चर्चा करू नये.
पत्राचाळ प्रकरण, कोविड सेंटर घोटाळ्याचे प्रकरण आहे. एका महिलेने तक्रार दिली आहे ते प्रकरण आहे संजय राऊत यांच्या डोक्यावर खूप प्रकरणी टांगती तलवार आहे. सुप्रिया सुळे यांना मी सांगेल की हे महाविकास आघाडीचे सरकार तुम्ही चिंता करू नका हे आमचे सरकार आहे आम्ही जेवढी काळजी घ्यायची तेवढी घेऊ. संजय राऊत यांना सांगा की काही अग्रलेख लिहायचे आहेत औरंग्याचे विषय घ्यायचे आहेत. निलेश राणे माजी खासदार आहेत त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास आहे.औरंगजेब विषयीची आमची भूमिका एकच आहे आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना ठेचून मारलं त्या औरंगजेबविषयी प्रेम नसणारच, मात्र, मी घरात सांगेन सहमत आहे की नाही असा सावध पवित्रा नितेश राणे यांनी घेतला.