नागपूर, 6 जून 2023
ओरिशातील बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातात 288 लोक मारले गेले. या मृतात्म्यांना जनआक्रोश- फॉर बेटर टुमारो संस्थेतर्फे बुधवार, 7 जून 2023 रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. व्हेरायटी चौक,सीताबर्डी येथे दुपारी 5.30 वाजता हा कार्यक्रम होईल.
एका मानवी चुकीमुळे झालेल्या या रेल्वे अपघातात अनेक संसार उध्वस्त झाले, अनेकांचे जीव गेले, अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अशाच एका चुकीमुळे रस्ते अपघातातदेखील दररोज सुमारे 400 मारले जात आहेत, हजारो लोक जखमी होत आहेत. या श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून असे अपघात होऊ नयेत, यासाठी जनजागृती केली जाणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनआक्रोशतर्फे करण्यात आले आहे.