उद्धव ठाकरेंना अल्झायमर झालाय-बावनकुळे

0

(Mumbai)मुंबई: पंतप्रधान मोदी यांनी काय केलं, हे विचारण्यापेक्षा 2019 साली केलेली भाषणं आठवा, असा सल्ला देत (BJP state president Chandrasekhar Bawankule)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांनी उद्धव ठाकरेंना अल्झायमरचा आजार झाला असावा, अशी टीका केली आहे. (Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी त्यांचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवले. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावेसे वाटले नाही. तेच उद्धव ठाकरे (PM Narendra Modi)मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत मोदींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणे केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे मोदीजींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील, असा टोलाही त्यांनी लगावला. महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका. तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का? याकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी पाच दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण 2024 साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं म्हणजेच घरी बसण्याचं काम देणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.