अमरावती – आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानच्या महिला कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांना अमरावती दौऱ्यात साडीचोळी भेट देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही भेट उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत जाऊन देण्याची महिलांची मागणी. अखेरीस अमरावतीच्या कॅम्प परिसरातील पोलीस वसाहतीमध्ये पोलिसांनी महिलांना रोखले. राणा यांच्या कार्यकर्त्यांनकडून उद्धव ठाकरे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.सुमती ढोके, माजी नगरसेविका यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
घेतानाच विदर्भ आठवतो -खासदार अनिल बोंडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
अमरावती – जेव्हा द्यायची वेळ येते, तेव्हा यांना, उद्धव ठाकरे यांना विदर्भाची आठवण येत नाही. पण जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र विदर्भ दिसतो. राज्यसभा असो की, विधानपरिषद असो, विदर्भातील एकही शिवसैनिक यांना सक्षम दिसत नाही ? उद्धव ठाकरे असो की शरद पवार असो, हे फक्त घ्यायची वेळ येते तेव्हाच यांना विदर्भ दिसतो असा आरोप भाजपचे राजसभा सदस्य अनिल बोंडे यांनी केला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना विदर्भाच्या प्रकल्पांना स्थगिती दिल्याचा आरोपही केला.
राणा दाम्पत्याविरोधात अमरावतीत ठाकरे गट आक्रमक
अमरावती- अमरावतीत राणा दाम्पत्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाल्याचे आज पहायला मिळाले.
ठाकरे गटाकडून रवी राणा व नवनीत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रवी राणा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न. पोलीस व ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात झटापट. उद्धव ठाकरे यांची सभा आटोपल्यानंतर ठाकरे गटाकडून राणा दाम्पत्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.