विभागीय लोकशाही दिनी तीन तक्रारी 

0
नागपूर :  विभागीय लोकशाही दिनी आज नव्याने प्राप्त तीन तक्रार अर्ज व प्रलंबित तीन अशा एकूण सहा प्रकरणांवर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात श्रीमती बिदरी यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले व प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
     उपायुक्त घनश्याम भूगावकर, अपर पोलीस अधीक्षक संदिप पखाले, नायब तहसिलदार आर.के.दिघोळे  यांच्यासह सहकार, आरोग्य, महानगरपालिका, पोलीस, महिला व बाल विकास, भूमापन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.