World Population Day जागतिक लोकसंख्या दिन

0

कसा सुरु झाला हा दिवस? World Population Day

११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्ज बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्राने याची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने डिसेंबर १९९० च्या ४५/२१६ च्या ठरावानुसार जास्त लोकसंख्येच्या परिणामाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला गेला. १९९० मध्ये हा दिवस ९० देशांनी साजरा केला.On July 11, 1987, the world’s five billionth child was born in Yugoslavia. On that occasion, United Nations decided to celebrate this day as World Population Day from 1989. The day was decided to be observed by the United Nations General Assembly in its resolution 45/216 of December 1990 to raise public awareness about the effects of overpopulation. In 1990, 90 countries celebrated this day.

लोकसंख्या म्हणजे काय ?

 

कोणत्याही देशातील शहर, जिल्हे, तालुके आणि खेड्या गावात राहणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येला देशाची लोकसंख्या म्हटले जाते. गरजेपेक्षा जास्त लोकसंख्या वाढल्याने देश व संपूर्ण जगाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पुढे आम्ही loksankhya vadhiche parinam आणि लोकसंख्या कमी करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत.

वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी समाजातील भरपूर लोकांना एकत्रितपणे काम करायला लावून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आखून आणि कृती आयोजित करून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. चर्चासत्रातील चर्चा, शैक्षणिक स्पर्धा, शैक्षणिक माहिती सत्रे, निबंधलेखन स्पर्धा, विविध विषयांवर सार्वजनिक स्पर्धा, पोस्टर वितरण, गाणी, क्रीडाविषयक कार्यक्रम, व्याख्याने आणि कविता, कलात्मक काम, घोषणा, मध्यवर्ती कल्पना आणि संदेश यांचे वितरण, कार्यशाळा, भाषणे, वादविवाद, गोलमेज चर्चा, पत्रकार परिषदा, विविध वृत्तवाहिन्या आणि इतर अनेक माध्यमांतून बातम्यांचे वितरण यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश असतो. लोकसंख्यावाढीच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या आरोग्य संघटना आणि लोकसंख्याविषयक विभाग एकत्रितपणे काम करतात. त्यासाठी परिषदा, संशोधन कार्ये, बैठका, प्रकल्प विश्‍लेषण इत्यादी अनेक कार्यक्रमांची आखणी केली जाते.

सन 2011 मध्ये जागतिक लोकसंख्या 7 अब्जांवर पोहोचली, तेव्हा वाढती लोकसंख्या हे विकासासमोरचे एक प्रचंड मोठे आव्हान असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ‘प्रजननविषयक आरोग्य सेवांची सार्वत्रिक उपलब्धता’ हा संदेश सन 2012 च्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’च्या कार्यक्रमानिमित्त जगभर दिला गेला. त्यावेळी जागतिक लोकसंख्या ही सुमारे 7 अब्ज 2 कोटी 50 लाख 71 हजार 966 एवढी होती. समाजातील जास्तीत जास्त कुटुंबे छोटी आणि आरोग्यपूर्ण असावीत आणि लोकांना शाश्‍वत भवितव्य मिळावे, यासाठी मोठी पावले उचलली गेली. प्रजननविषयक आरोग्यासाठी आवश्यक त्या सुविधांचा मागणीनुसार पुरवठा व्हावा, या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली. प्रजननविषयक आरोग्यात वाढ करून आणि लोकसंख्यावाढीचा दर घटवून सामाजिक दारिद्य्र कमी करण्यासाठीही पाऊल आजमितीस उचलले गेले.

जगभरामध्ये गर्भवतींचे अनोराग्य आणि त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामागे प्रजननविषयक आरोग्याच्या समस्या हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे ‘संयुक्त राष्ट्रसंघाचा विकासविषयक कार्यक्रम (UNDP) त्याकडे आता विशेष लक्ष देत आहे. जागतिक स्तरावर प्रसूतीदरम्यान दररोज सुमारे 800 महिलांचा मृत्यू होतो. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी लोकसंख्या दिनाची मोहीम ‘प्रजनन आरोग्य आणि कुटुंब नियोजन’ याविषयी जगभरातील लोकांची माहिती आणि कौशल्य वाढवण्याचे काम करते. जगभरात दरवर्षी सुमारे 1.8 अब्ज तरुण-तरुणी प्रजनन वयात प्रवेश करत असतात. त्यामुळे प्रजनन आरोग्याच्या प्राथमिक बाबींकडे त्यांचे लक्ष वेधणे अनिवार्य आहे, त्यातही 15 ते 19 वयोगटातील किशोरवयीनांच्या लैंगिकतेशी संबंधित समस्या सोडविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण आकडेवारीनुसार, या वयोगटांतील सुमारे दीड कोटी महिला माता बनतात आणि सुमारे 40 लाख महिला गर्भपात करवून घेतात.

लोकसंख्या वाढीचे परिणाम

  • इंधन आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा होणारा ऱ्हास …
  • हिंसाचार …
  • बेरोजगारीची समस्या …
  • महागाई …
  • महामारी …
  • कमी जीवन काळ …
  • विलुप्त होणारे वन्य जीवन …
  • अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम

    १. अन्नधान्याचा तुटवडा – कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते. दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी लागणा-या पाण्याची टंचाई तसेच पाणी अनेक कारणांसाठी वापरावे लागते. त्यामध्ये जर दुष्काळ पडला तर पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही व अन्न धान्य मोठया प्रमाणावर म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणत पिकविता येत नाही त्यामुळे महागाई वाढते व कुटुंबाला पुरेसा आहार मिळणे कठीण होते व यामधूनच कुपोषणाचे प्रमाण वाढते व अनेक रोग आजारांना सामोरे जावे लागते.

    २. अपुरा निवारा – पूर्वी जर कुटुंबात ठरावीक माणसे राहत असतील तर त्यांना ते घर राहण्यास पुरते. परंतु त्याच कुटुंबात अनेक सदस्य वाढले तर ते घर अपुरे पडते व दुसरे बांधावे लागते. जरी जास्त घरे बांधली तरी जमीन वाढत नाही. त्याचा परिणाम अन्नधान्य पिकविण्यावर होते.

    ३. दळणवळण, शैक्षणिक, आरोग्य सुविधा यांचा अभाव – लोकसंख्या वाढल्यामुळे प्रवासाच्या ज्या सुविधा आहेत त्या अपु-या पडतात. तसेच अपघातांचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर शाळा कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेणे अवघड होते. वरील अडचणीबरोबर शासनाला आरोग्य सुविधा पुरविणे अवघड होते.

    ४. जंगलतोड – जळणासाठी लाकूड, घरबांधणी / फर्निचर यासाठी माणसाने जंगलतोड केली. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावर झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. तसेच उद्योगासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी सुद्धा जंगलतोड झाली. याचा परिणाम पाऊस वेळेत न पडण्यावर झाला.

    ५. स्थलांतर – नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ होणा-या स्थलांतरामुळे शहरांची झपाटयाने वाढ होते व शहराच्या सर्व यंत्रणांवर ताण पडू लागतो. कारखान्याच्या धुराने, घाण पाणी नदीमध्ये सोडल्याने पाणी दूषित होते. वाहनामुळे हवा प्रदूषण होते.

    ६. साधनसंपत्ती व उर्जेची कमतरता भासते.

    ७. गुन्हेगारीचे वाढते प्रमाण – शिक्षण जरी मिळाले तरी नोकरी मिळत नाही व गरिबी असल्यामुळे जीवन व्यवस्थित जगता येत नाही, त्यामुळे गुन्हेगारी व अत्याचाराचे प्रमाण वाढते.

    वरील सर्व कारणांमुळे आपल्याला स्वस्थ व सुरक्षित जीवन जगता येत नाही. ह्या सगळ्यांची तीव्रता कमी करायची असेल तर त्यावरचे उपाय आपण लगेचच आणि आपल्या कुटुंबापासून सुरु केले पाहिजेत.

    स्त्रोत :लोकसंख्या शिक्षण,माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका,वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्

    लोकसंख्येचा फक्त आकडाच महत्त्वाचा नाही, तर त्याचे वर्गीकरणही विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारताची लोकसंख्या सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. लोकसंख्यावाढीचा दर जेव्हा जास्त असतो. म्हणजेच जननदर जेव्हा जास्त असतो, तेव्हा लोकसंख्येत लहान मुलांचे प्रमाण अधिक असते आणि पर्यायाने ज्येष्ठ व्यक्तींचे कमी असते. सर्व विकसनशील देशांची ही प्रातिनिधिक स्थिती आहे. याच्या बरोबर उलटी स्थिती विकसित देशांची आहे – मुले कमी आणि ज्येष्ठ अधिक. गेल्या काही वर्षांत भारताचा जननदर झपाट्याने खाली आल्यामुळे मुलांचे प्रमाण कमी होऊन उत्पादक वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण वाढले आहे. अर्थात त्याच्याच बरोबरीने देशातील ज्येष्ठांचे प्रमाणही हळूहळू वाढते आहे. जर विकास साधायचा असेल, तर उत्पादक वयोगटातील सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्ये मिळायलाच हवीत. त्याखेरीज त्यांचे उत्पन्न वाढणार नाही; पर्यायाने देशाच्या सकल उत्पन्नात वाढ होणार नाही. जेव्हा कौशल्याने आणि शिक्षणाने विकसित पिढ्या निर्माण होतील तेव्हाच लहान कुटुंबाची संकल्पना मूळ धरेल आणि टिकेल, त्यांचा जननदर कमी होईल. हेच प्रयत्न लोकसंख्यावाढीचा प्रश्न सोडवायला मदत करतील.

    https://youtu.be/cUnsxt-sS4M