उद्धव ठाकरेंना पाकिस्तानच्या प्रमाणपत्राची गरज हेच दुर्दैव- बावनकुळे

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची किती आणि तुमची उंची किती, असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांना करून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिला, की मोदीजींच्या वादळाला ठाकरे घाबरले असून, मोदीजींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील.” बावनकुळे म्हणाले, मोदीजींचा वारंवार एकेरी उल्लेख टाळायला हवा होता. पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक चुका करत आहेत. कधी ना कधी स्फोट होईल. ते नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.  बावनकुळे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीगत टीका करुन नेतृत्वाचा अपमान करू नये.ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. दुसऱ्यांना संस्कार शिकवता. पंतप्रधान मोदीजींचे नेतृत्त्व 150 देशांनी मान्य केले आहे. ठाकरे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. 2014 व 2019 मध्ये ज्यांच्या भरवशावर तुम्ही तुमचे आमदार-खासदार निवडून आणले आणि आज त्यांच्यावर एकेरी टीका करुन बेईमानी करत आहात.  बावनकुळे म्हणाले, देवेंद्रजींनी तुमच्यावर भावासारखे प्रेम केले. एकवेळ भाजपचे काम केले नाही मात्र उद्धवजींचे काम केले. तुमच्या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात. एकवेळ असा होता की मोदीजी देशातले सर्वोत्तम नेते कसे आहेत याबाबत मंचावरून उद्धव ठाकरे सांगत होते. उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावे लागतेय. यापेक्षा अधिक दुर्दैव कोणते? ठाकरेंचा भारतीय लोकांवर  विश्वास नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कसं सोडलं? याचं प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिलेय. त्यांना रोज लोकं सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानी लोकांना माहीत आहे शिवसेना कुणाची? हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया देखील बावनकुळे यांनी व्यक्त केली