भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन
नागपूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.
शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
शाह आणि श्री. फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ.राजेंद्र गवई, प्रा. डी. जे. दाभाडे,प्रा.आगलावे, विलास गजघाटे,भंते दीपंकर आदींनी श्री. शाह आणि श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह ,शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके, माजी मंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर आदी यावेळी उपस्थित होते.
____________________________________________________________________________________
टीप : शंखनादच्या या पाककला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरावा. तसेच क्यूआर कोड स्कॅन करून स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरावे. नोंदणीकृत स्पर्धकांना स्पर्धेची विस्तॄत माहिती व्यक्तिगत पाठविण्यात येईल.
https://forms.gle/m4ggNfcpcxr3yPjaA
प्रिया मराठे नागपुरात कशासाठी येत आहेत? | Shankhnaad Khadya Yatra Cooking Competiton | #nagpurnews |