नागपूरः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी नागपूर दौऱ्यात रेशीमबाग येथे डॉ हेडगेवार स्मारक समिति परिसराला भेट देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार तथा द्वितीय सरसंघचालक गोलवलकर गुरुजी यांच्या स्मृतिंना अभिवादन केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एका दैनिकाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी नागपुरात रेशीमबाग येथे डॉ हेडगेवार स्मारक समिति परिसराला भेट देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार तथा द्वितीय सरसंघचालक गोलवलकर गुरुजी यांच्या स्मृतिंना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघाचे नागपूर महानगर संघचालक डॉ. राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी रेशीमबाग परिसरातील निवडक नागरिकांता उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. शहा यांनी यावेळी हेडगेवार स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काहीवेळ चर्चा केली व परिसराची माहिती जाणून घेतली.
गृहमंत्री अमित शहा यांची डॉ. हेडगेवार स्मृति परिसराला भेट
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा