सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, 92 प्रकरणी कारवाई, 73 हजार वसूल

0

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवारी शोध पथकाने 92 प्रकरणांची नोंद करून 73000 रुपयाचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकानी ही कारवाई केली.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा