सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण, आता निकालाकडे लक्ष

0

नवी दिल्ली : राज्यात गेल्यावर्षी जून महिन्यात सुरु झालेल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण झाली. मागील नऊ महिन्यापासून ठाकरे व शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद झाले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ नेमका काय निकाल देते, याकडे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि सध्याचे सरकार असंवैधानिक असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. तर शिवसेनेत बंडखोरी झालेली नसून ते केवळ मतभेद असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.

 

https://youtu.be/iEBAF1-Tvs0

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा