तवांग संघर्षाच्या पार्श्वभूमिवर अमेरिकेचा चीनला इशारा

0

वॉशिग्टन: भारतात अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये (India-China Clashes in Tawang Sector) भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अमेरिकेने भारताना पाठिंबा देताना चीनला इशारा दिलाय. पेंटागॉनने या चकमकीची दखल घेत एक निवेदन जारी केले असून त्यात आम्ही आमच्या सहयोगी देशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत, असा इशारा अमेरिकेने चीनला दिलाय. भारताने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, त्या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील तसेच अमेरिका भारत-चीन सीमेवर (India-China Border Dispute) सुरू असलेल्या हालचालींवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याचे पेंटागॉनले म्हटले आहे. चीन हुकूमशाही पद्धतीने सीमेवर आपले सैन्य तैनात करून लष्करी पायाभूत सुविधा उभारत आहे. चीन आता भारताशिवाय इतर देशांसाठीही मोठे आव्हान बनत चालला असून ही चितेंची बाब असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.


9 डिसेंबरची चकमक


अरुणाचल सीमेवर तवांग येथे ९ डिसेंबरला भारत आणि चीनच्या लष्करात चकमक उडाली. सुदैवाने यात शस्त्रांचा वापर झाला नाही. मात्र, या हाणामारीत खिळे लावलेल्या लाठ्याकाठ्यांचा वापर झाला. यात चीनसह भारताचेही काही सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेशी संबंधित काही व्हीडिओ देखील व्हायरल झालेले असून त्यात भारतीय लष्कराचे जवान चीनी सैनिकांना चोप देत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. लष्कराच्या जवानांनी आक्रमक भूमिका घेतल्याने चीनी सैनिक पळाल्याचेही व्हिडिओत दिसून आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा