
मुंबई : पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी दादर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.आज सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुलोचना दीदींचं निधन झालं. उद्या सायंकाळी ५ वाजता दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
व्हेंटिलेटरवर सुरू होते सुलोचना दीदी यांच्यावर उपचार
3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना थेट व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, व्हेंटिलेटरवर ठेऊनही त्यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. मार्चपासूनच त्यांना श्वासोच्छवासा समस्या या निर्माण झाल्या होता. त्यावेळी तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये मोठी सुधारणा झाली होती.
सोमवारी मुंबईमध्ये होणार अंतिम संस्कार
सोमवारी मुंबईमध्ये सुलोचना दीदी यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याचे सांगितले जात आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर बाॅलिवूड विश्वाला अत्यंत मोठा धक्का बसलाय. अनेक बाॅलिवूड स्टारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केलीये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते सुलोचना दीदी यांच्या मदतीला धावून
सुलोचना दीदी यांची मार्च महिन्यात तब्येत खराब झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदी यांच्या सर्व उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे जाहिर केले होते. इतकेच नाही तर तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून 3 लाख रुपयेही देण्यात आले होते.
अनेक चित्रपटांमध्ये सुलोचना दीदी आईच्या भूमिकेत
सुलोचना दीदी यांनी बाॅलिवूड चित्रपटांसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मराठा तितुका मेळावा, मोलकरीण, बाळा जो र, सांगते ऐका, सासुरवास अशा चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील सुलोचना दीदी यांनी काम केले आहे.
250 हिंदी चित्रपट आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये केले काम
विशेष म्हणजे सुलोचना दीदी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका केली आहे. दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही सुलोचना दीदी यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुलोचना दीदी यांनी कारर्किद अत्यंत मोठी असून त्यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 250 हिंदी चित्रपटांमध्ये आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
चित्रपटातली आई म्हणून सुलोचना ओळखल्या जात असत. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या.
1943 साली हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर राजकपूर शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीबरोबरही त्यांनी काम केलं.
‘वहिनीच्या बांगड्या,’ ‘मीठ भाकर’ ‘मराठा तितुका मेळावा’ साधी माणसं, कटी पतंग हे त्यांचे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले गाजलेले चित्रपट आहेत.
सुलोचना दीदी म्हणून त्या सगळीकडे ओळखल्या जात. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 ला झाला.
चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा इतकी शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. म्हणून भालजी पेंढारकरांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं.
ते वाचणं अतिशय क्लिष्ट काम होतं. मात्र त्याबद्दल अजिबात तक्रार न करता त्यांनी ती मासिकं वाचली आणि त्या भाषा दिव्यातून गेल्या.