20 विकासकामांचे गडकरींनी केले उदघाटन

0

नागपूर :फाटकमुक्त रेल्वे उड्डाणपुलाची योजना पुढे नेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज महारेलद्वारे निर्मित ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण तसेच ११ नवीन उड्डाणपुलांचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले.
एकाच वेळी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरील २० विकासकामांचा सोहळा झाला. सदर कार्यक्रमात नागपूर येथील फाटक क्र. ३४ येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि राज्यातील अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, ठाणे, पालघर, लातूर, जळगाव व बुलढाणा येथील ११ उड्डाणपुलांचे भूमिपूजन करण्यात आले. हे सर्व पूल सेतुबंधन योजनेंतर्गत समाविष्ट आहेत.
महाराष्ट्रात प्रथमच ९ उड्डाणपुल एकाच वेळी नागरिकांसाठी खुले केले जात आहेत. अल्प कालावधीत १५ उड्डाणपुल बांधून जनतेला वाहतुकीसाठी खुले करून देत महारेलने विकासाचा नवीन टप्पा गाठला आहे. सीआरआयएफ फंडमधून सेतुबंधन योजनेंतर्गत ९१ उड्डाणपुल बांधण्यात येत आहेत ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात २५ तर दुसऱ्या टप्प्यात ६६ उड्डाणपुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. बॉक्ससाठो… रेल्वे फाटकावरील अपघात टाळण्याचा प्रयत्न
रेल्वे फाटकांमुळे होणारे अपघात व त्यांचे गांभीर्य लक्षात घेता त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या नवीन उड्डाणपुलांमुळे रेल्वे फाटकांवरील अपघात कमी होऊन राज्याला सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम वाहतुकीची साधने उपलब्ध होतील यावर गडकरी यांनी भर दिला.