24 तासात दोन विद्यार्थीनीची आत्महत्त्या

0

नागपूर : इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर २४ तासात दोन विद्यार्थीनींनी आत्महत्त्या केल्याच्या घटना नागपुरात उघडकीस आल्या. एकीने दहावीत नापास झाली म्हणून तर दुसरीने केवळ ७१ टक्के गुण मिळाल्याने नाराज झाल्याने आत्महत्त्या केली.
सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरा येथे राहणारी चेतना भोजराज भोयर (वय १६) हीला दहावीत ७१ टक्के गुण मिळाले. यामुळे नाराज चेतनाने गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत दहावीत नापास झाल्यामुळे वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साेनबा नगर येथे राहाणाऱ्या रामदुलारी पंचम झारीया (वय १७) हिने दहावीत नापास झाल्यामुळे गळफास घेतला